मराठी अभिनेत्री शिवानी नाईक यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराष्ट्र आयडॉल पुरस्काराचे वितरण संपन्न
समृद्ध ठिकाणी समृद्ध व्यक्तींचा सन्मान होणे हि फार मोठी गोष्ट - शिवानी नाईक मराठी अभिनेत्री
पुणे (प्रतिनिधी ) - अप्पी आमची कलेक्टर फेम मराठी अभिनेत्री शिवानी नाईक यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराष्ट्र आयडॉल पुरस्कार २०२४ चे वितरण करण्यात आले.राजर्षी शाहू प्रतिष्ठान व साप्ताहिक जागृत शोध यांच्यावतीने दिनांक १ सप्टेंबर २०२४ रोजी सावित्रीबाई फुले गंजपेठ पुणे येथे पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी लावणी सम्राट किरण कोरे,रिल स्टार मराठी अभिनेत्री पूजा धामे,खेळांचा बादशहा बाळकृष्ण नेहरकर,सामाजिक कार्यकर्त्या शोभा बल्लाळ,एकनाथ कोरे,संभाजी जामदार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
समृद्ध ठिकाणी समृद्ध व्यक्तींचा सन्मान होणे हि फार मोठी गोष्ट आहे संपूर्ण महाराष्ट्रातून सरपंच ,ग्रामसेवक,शिक्षक उपस्थित आहेत.मातीतील व्यक्तींचा सन्मान होणे हि फार मोठी गोस्ट आहे. राजर्षी शाहू प्रतिष्ठान व साप्ताहिक जागृत शोध यांचे कार्य कौतुकास्पद आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातून सरपंच,ग्रामसेवक,शिक्षक,उद्योजक अश्या विविध क्षेत्रातील मान्यवरांना राजर्षी शाहू महाराष्ट्र आयडॉल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.ग्रामीण भागाच्या विकासात महत्वाची भूमिका सरपंच,ग्रामसेवक,शिक्षक हे बजावीत असतात.राजर्षी शाहू प्रतिष्ठान व जागृत शोध वृत्तपत्र यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात येते.संस्थेच्या वतीने दार वर्षी राजर्षी शाहू आदर्श सरपंच ,आदर्श ग्रामसेवक,आदर्श शिक्षक,उद्योग भूषण,सहकार भूषण,आदर्श ग्रामपंचायत,महाराष्ट्र आयडॉल,मराठवाडा आयडॉल,कोकण आयडॉल,विदर्भ आयडॉल,गावकारभारी असे विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.
महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाच्या विकासात महत्वाची भूमिका बजाविणारे मान्यवरांना प्रोचाहित करण्याचे काम राजर्षी शाहू प्रतिष्ठान दार वर्षी करत असते. राजर्षी शाहू महाराष्ट्र आयडॉल पुरस्कार २०२४ साठी राज्याच्या विविध भागतून ५० जणांची निवड करण्यात आली असल्याचे सोहळ्याचे आयोजक तथा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व साप्ताहिक जागृत शोध चे संपादक भगवान श्रीमंदीलकर यांनी सांगितले.
राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन राजर्षी शाहू प्रतिष्ठान ची २०१४ साली स्थापना करण्यात आली.संस्थेच्या वतीने आजपर्यंत विविध सामाजिक उपक्रम राबविले असून कोविड महत्वाची भूमिका संस्थेने बजावली.आजपर्यंत दहा वेळा पुरस्कार सोहळ्याचे यशश्वी आयोजन करण्यात आले आहे.मा.ना.हरिभाऊ बागडे विधानसभा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य.विधान परिषद अध्यक्ष मा.ना.रामराजे निंबाळकर,मा.ना.अतुल सावे सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य.राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी दोन वेळा कार्यक्रमास उपस्थि राहिल्या आहेत.राज्याचे तत्कालीन राज्यपाल भगत शिंह कोशायरी यांनी राजर्षी शाहू प्रतिष्ठान च्या कार्याची दाखल घेऊन कौतुक केले आहे.
राजर्षी शाहू प्रतिष्ठान व जागृत शोध वृत्तपत्र यांच्या संयुक्त विद्यमाने पुढील पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले असून त्यासाठी विहित नमुन्यातील ऑनलाइन प्रस्ताव मागितले आहेत आगामी होणारे
पुरस्कार सोहळे होत आहेत.आमच्या अधिक माहितीसाठी संपर्क मो.९५४५८९१५१५ www.rajarshishahupratishthan.com वेबसाईटला आजच भेट द्या
मराठवाडा आयडॉल पुरस्कार २०२४
विदर्भ आयडॉल पुरस्कार २०२४
कोकण आयडॉल पुरस्कार २०२४
Rajarshi Shahu pratishthan. All Rights Reserved AIS.